अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत वाहतुकीचा खोळंबा होत आहे . वाहने पार्किंगसाठी अपुरी जागा हा प्रश्न जटील बनला आहे .याचा फटका हा स्थानिक नागरिकांना , परगावच्या भाविकांना बसत आहे. परगावच्या भाविकांचीं वाहने ही रस्त्याच्या बाजूला उभी करून दर्शनाला जात आहेत . यावर अंकुश लावण्यात वाहतुक नियंत्रक पोलीसाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत . यामुळ पार्किंग व्यवस्थेचा फज्जा उडाला आहे. भाविकां सह या भागातुन मार्गक्रमण करणाऱ्याना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नगर पालिका व पोलीस प्रशासनाकडून पार्किंग व्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून’ परगावच्या भाविकातून केली जात आहे.
अक्कलकोट शहरात अक्कलकोट निवासी दत्त अवतार श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पोर्णिमा सलग सुट्टी दिवशी शनिवारी , रविवारी गुरुवारी परगावच्या भाविकांची प्रचंड गर्दी होते . शनिवार रविवार परगावच्या भाविकांच्या वाहनांच्या रांगा या शहरात सर्वत्र पहावयास मिळत होत्या. शहरातील हत्ती तलाव परिसरात बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने लावण्यात आल्याने या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. शनिवारी रात्री या परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परगावचे भाविक भक्त हे सर्रासपणे चार चाकी वाहनातून येत आहेत. परगावच्या वाहनांना वाहन तळाची व्यवस्था नसल्याने ही वाहने रस्त्याच्या बाजूलाच उभी करून दर्शना ला जात आहेत. यामुळे भाविक दर्शन घेऊन परत येईपर्यंत वाहतुकीस अडथळा निर्माण होतो .गर्दीच्या काळात आणि सुट्ट्यांच्या काळात परगावच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था वेगळी करावी लागणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन , नगरपरिषद , श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान , तहसील प्रशासन यांनी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटात भाविक हे लाखोंच्या संख्येने येत आहेत. भाविकांच्या वाहनांमुळे अक्कलकोट शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे . याचा फटका शहरातील नागरिकांना अबालवृद्ध यांना बसत आहे .पोलीस प्रशासन हे गर्दीच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात उपाययोजना करत असते. पण हल्ली सलग गर्दी पडत असल्याने परगावच्या भाविकांच्या वाहनांसाठी वेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे. अक्कलकोट शहरात गर्दीच्या वेळी होणारी वाहनांच्या गर्दीचे नियोजन पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेने करावे लागणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेने उपाययोजना करून अक्कलकोट आतील स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट शहरात परगावच्या वाहनांची गर्दी रोखण्यासाठी मैंदर्गी रोड बायपास द्वारे श्री स्वामी समर्थ मंदिराकडे वाहनांना प्रवेश द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.


























