Monday, June 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकऱ्यांचा एल्गार यशस्वी; युटोपीयन शुगरने ऊस दर जाहीर करत पेच सोडवला

तरुण भारतbyतरुण भारत
December 17, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर ३ हजार रुपये जाहीर केला असताना मंगळवेढा तालुक्यातील एकाही कारखान्याने दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अखेर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत युटोपीयन शुगर कारखान्याने पुढाकार घेत उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करून ऊस दराची कोंडी फोडली आहे.

ऊस दरासाठी मंगळवारी आंदोलनासाठी गेलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती युटोपीयन शुगर कारखाना प्रशासनाने पहिला हप्ता ३ हजार रुपये देण्याचा निर्णय लेखी पत्राद्वारे सुपूर्त केला. हे पत्र हाती पडताच अवघ्या एका तासात भैरवनाथ शुगर कारखान्यानेही उसाला ३ हजार रुपये दर देण्याबाबतचे लेखी पत्र शेतकरी संघटनेकडे दिले. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी आंदोलनाचा भडका उडाला असून सर्व शेतकरी संघटनांनी एकजूट करत ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील कारखानदारांनी आपापसातील राजकीय मतभेद विसरून सगळ्यांनी एकच दर जाहीर करण्याची ‘गठ्ठी’ केल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत होता. हा डाव ओळखून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आक्रमक आंदोलन छेडले.

लोकशाही मार्गाने मात्र आक्रमक स्वरूपात आंदोलन सुरू झाल्याने नाईलाजाने कारखानदारांना दराबाबत निर्णय घ्यावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे स्वरूप बदलत केवळ निवेदन देण्याऐवजी थेट गव्हाणीत बसून कारखाना बंद पाडण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांत आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. लोकमंगल कारखान्यावर गेल्या दोन दिवसांपासून जनहित शेतकरी संघटनेचेही आक्रमक आंदोलन सुरू आहे.

रासायनिक खतांचे वाढते दर, मजुरीचा खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. त्यामुळे आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढत असून कारखानदारांना निर्णय घेणे भाग पडत आहे.

तालुक्यातील प्रत्येक कारखानदार ‘इतर कारखानदार जो दर जाहीर करेल, तोच दर आम्ही देऊ,’ अशी भूमिका शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांसमोर मांडत होते. मात्र युटोपीयन शुगर कारखान्याने पहिला हप्ता ३ हजार रुपये देण्याचा निर्णय लेखी जाहीर करत हा पेच सोडवला आहे. त्यामुळे आता आवताडे शुगर , दामाजी शुगर तसेच तालुक्यालगतचा जकराया शुगर हे तीन हजार रुपये जाहीर करणार की स्पर्धेत यापेक्षा अधिक दर देतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.युटोपीयन शुगर कारखान्यावर पहिला हप्ता ३ हजार रुपयांचे पत्र स्वीकारताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, स्वाभिमानीचे बाहुबली सावळे, अनिल बिराजदार, संतोष सोनगे, बाळासाहेब जगदाळे, गणेश लामकाने, निवास नागणे, राजेंद्र पवार, किशोर दत्तू यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

“युटोपीयन शुगर कारखान्याने उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करून शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि भावनांचा सन्मान केला आहे. हा निर्णय आम्ही पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने घेतला आहे. मात्र हा केवळ सुरुवात असून तो इतर सर्व साखर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरावा. आवताडे, भैरवनाथ, दामाजी, जकाराया तसेच जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून किमान याच पातळीवर, किंबहुना त्यापेक्षा जास्त दर जाहीर करावा. शेतकरी आज आर्थिक संकटात सापडलेला असून कारखानदारांनी एकजुटीने दर दाबण्याऐवजी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी. अन्यथा शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आम्ही याच ठिकाणी देत आहोत.”

— युवराज घुले, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

फोटो ओळ :

युटोपीयन शुगर कारखान्याने पहिला हप्ता ३ हजार रुपये जाहीर केल्याचे लेखी पत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना देताना कारखाना प्रशासन दिसत आहे.

छाया विजय भगरे मंगळवेढा.

Post Views: 66
Previous Post

अक्कलकोट शहरात वाहतुकीचा खोळंबा !पार्किंग व्यवस्थेचा उडाला फज्जा !

Next Post

ऊस दरवाढ आंदोलनाची धग कायम ! पहिली उचल ३००० देण्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ऊस दरवाढ आंदोलनाची धग कायम ! पहिली उचल ३००० देण्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0910622

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697