तभा फ्लॅश न्यूज/हिंगोली : हिंगोली शहरात कावड यात्रा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे यांनी अधिसूचना काढून काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतुकीस बंद असलेले मार्ग :
औंढानागा कडून हिंगोली शहरात येणारी सर्व जड व प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद. वाशिमकडून हिंगोली शहरात येणारी सर्व वाहने पूर्णपणे बंद.
परभणीकडून वाशिमकडे जाणाऱ्या वाहनांसाठी : नरसी टी पॉइंट – सेनगाव – गोरेगाव – कन्हेरगाव मार्गाचा वापर करावा. वाशिम कडून परभणी कडे जाणाऱ्या वाहनांसाठी : कन्हेरगाव – गोरेगाव – सेनगाव – नरसी फाटा मार्ग उपलब्ध आहे. या बदलाची अंमलबजावणी आज दि. 04/08/2025 रोजी दुपारी 12:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत राहील.

























