सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल म्हैसूर-उटी-मडकेरी या दक्षिण भारतातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी गुरुवार दि.८ जानेवारी रोजी मार्गस्थ झाली. सहलीच्या वाहनांचे पूजन पालकांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, सहल विभाग नियंत्रक व पर्यवेक्षक उत्तम सरगर, विभाग प्रमुख डी.के.पाटील, सहभागी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या सहलीमध्ये इ.९ वी व ११ वीचे १३२ विद्यार्थी व १६ शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले असून म्हैसूर मधील म्हैसूर पॅलेस, वृंदावन गार्डन, प्राणी संग्रहालय, चामुंडादेवी मंदिर, वॅक्स म्युझियम उटीमधील चॉकलेट फॅक्टरी, दोडाबेटा पॉईंट, बॉटनिकल गार्डन, चहाचे मळे तसेच मडकेरी व श्रीरंगपट्टणम या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहेत.


















