पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील मुस्लीम बांधवांनी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.यामध्ये मुन्नाभाई पठाण, बाबा सय्यद, अजिज शेख,महीबुब मुजावर, साजिद शेख,आसिफ पठाण, अन्वर शेख, तोसिफ पठाण यांनी आज माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी जाहीर प्रवेश केला.
यावेळी माळशिरस तालुका भाजपा मंडल अध्यक्ष नितीन मोहीते,माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, राहुल मदने ,भाजपा शहराध्यक्ष प्रमोद भैस, मुजमील तांबोळी,ताहेर मुलाणी, समीर आतार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या प्रमाणे सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणयाचे काम आपण प्रामाणिकपणे करीत आहे.
फोटो _ पिलीव येथील मुस्लिम बांधवांचा माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.

























