उमरी ( प्रतिनिधी ) उमरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम पांडूरंग सवई हे 3० जुन २०२४ रोजी सेवानिवृत झाल्याने त्यांना सेवापुर्ती सोहळा थाटात साजरा करून निरोप देण्यात आला आहे .
श्रीराम पांडूरंग सवई हे राहणार उमरी येथिल रहिवाशी असून त्यांचा जन्म दि २७ जुन १९६६ रोजी उमरी शहरातील आंबेडकर नगर येथे झाला . त्यांनी पोलिस दलात ४ नोव्हेंबर १९९२ मध्ये रुजू झाले . त्यांनी कुंडलावडी पोलिस ठाणे , नांदेड ग्रामिन पोलिस ठाणे , वजीराबाद नांदेड पोलिस ठाणे , मुखेड पोलिस ठाणे आणि शेवट आपल्या मुळ गावी म्हणजे उमरी पोलिस ठाणे येथे त्याचां सेवापुर्ती सोहळा साजरा करण्यात आला आहे . त्या कालावधी मध्ये एकंदरीत ३२ वर्ष उत्कृष्ट सेवा केली आहे त्यांनी त्या कालावधीत हुंन्डाबळी सारखे प्रकरण हाताळून पुन्हा कुंटुबाचे मने जुळन देवून सामाजिक न्याय दिला आहे . गंभीर गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला आहे मनाने प्रेमळ वेळप्रसंगी कठोर भुमिका घेवून वर्दीतला मानुस म्हणून मानुसकी दाखवून दिली आहे .त्यांच्या कार्याची दखल घेवून पोलिस खात्या अंतर्गतच शिनारीटी प्रमाणे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे . त्यांचा नियत सेवापुर्ती दि ३० जून २०२४ रोजी झाला आहे .
नांदेड पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी श्रीराम सवई व त्यांच्या सुविधा पत्नी शकुंतला सवई यांचा सहपत्नी सत्कार नांदेड पोलिस दला तर्फे करून सेवापुरती निरोप दिला आहे . डी वाय एस पी प्रशांत संपते , पोलिस निरीक्षक अकुंश माने ही उमरी पोलिस ठाणेच्या वतीने सेवापुर्ती शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचा कर्तव्याचा गौरव करण्यात आला आहे त्या निमित सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम सवई यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा उमरी समाजबांधवा च्या वतिने ४ जुलै २०२४ रोजी संत रविदास मंगल कार्यालय येथे ठेवण्यात आला होता यावेळी अनेकानी मनोगत व्यक्त करतांना भावनादिस झाले होते तर अनेकाचे डोळे पानावले आहेत .
कुंडलवाडी , मुखेड , नांदेड येथिल तत्कालीन पोलिस मित्र , उंद्री ( प .दे ) जाहूर , पाळा , एकलारा , ता मुखेड येथिल प्रतिष्टीत नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शवीली होती श्रीराम सवई हे पोलिस खात्यातून सेवानिवृत झाले तरी ते आम्हा पोलिस बांधवासाठी तितकेच प्रिय असणार असून त्यांनी शासकीय सेवा उत्कृष्टरित्या बजावले पण यापुढील आयुष्य हे सामाजिक बांधलकी म्हणून समाजसेवा करावी असे निरोप समारोपचे अध्यक्ष उमरी पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे .
यावेळी उमरी पत्रकार , उमरी पोलिस, सामाजीक , राजकीय पक्षाचे मुख्य पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .