उमरी डॉ . अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास हैबतकर तर उपाध्यक्षपदी साहेबराव शेळके .
उमरी ( प्रतिनिधी )
उमरी येथे डॉ.आण्णा भाऊ साठे यांच्या १०४ वी जयंती उत्सव समिती रापतवार नगर ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास हैबतकर तर उपाध्यक्षपदी साहेबराव शेळके यांची निवड करण्यात आली आहे . उमरी रापतवार नगर येथे दरवर्षी डॉ आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते . यंदा ही जयंती थाटात साजरी व्हावे म्हणून दि १४ जुलै २०२४ रोजी रविवारी सायंकाळी ७ः३० वाजता लिंबूनी बुध्द विहार येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सदानंद गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते ) हे होते,


तर नामदेव गायकवाड व चांदु झुंजारे या मान्यवराच्या उपस्थित अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या च्या अध्यक्ष उपाध्यक्ष उत्सव समितीची निवड करण्यात आली आहे . संतोष नामेवार यांनी नाव सुचविल्या प्रमाणे सर्वानी समती दर्शविल्याने कार्यकरणी जाहीर करण्यात आली
अध्यक्षपदी रामदास हैबतकर तर उपाध्यक्षपदी साहेबराव शेळके, सचिवपदी राम वाघमारे , नवनिर्वाचित उत्सव समितीचे टाळ्या वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले या बैठकीला उमरी रापतवार नगर येथील सर्व मातंग समाज बांधव उपस्थित होते व सल्लागार पदी डि.एम कांबळे ,द्रोणाचार्य, जाधव ,डोगंरे , लिपीक साईराज शेळके ,सतीश कांबळे ,किशोर कवडिकर , संतोष भाहेगावकर, शिवाजी सुंकळे,संजय बोथीकर, संतोष हैबतकर,साहेबराव गव्हाळकर,कपील हैबतकर,यांची नियुक्ती करण्यात आली,
व तसेच सदस्य पदी,आनंदा वाघमारे , प्रफुल वाघमारे.सचिन हैबतकर,संतोष शेळके,बाबु मामा गायकवाड,शिवा काळे,बड्डी आण्णा, नरेंद्र नामेवार,चांदु कांबळे,गणेश झुंजारे,लखन शिंदे,अतीश वाघमारे,गजु गायकवाड,त्रिरत्न सवई, कपील जोंधळे ,लक्षमन नामेवार , साहेबराव सुर्यवंशी, गजानन अडगुडवाड, गंगाधर कटकदवणे ,बालाजी सूर्यवंशी, शेख अहेमद,शेख जावेद, सय्यद जुबेर.दत्ता दुधंबे, साई सुंकळे, शेख गौस भैया आदिंची नियुक्ती करण्यात आली बैठकीत उपस्थीत मान्यवराचे संतोष नामेवार यांनी आभार मानले आहे