सोलापूर – मास्टर्स क्रिकेट अकादमीच्या 12 वर्षांखालील लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेट अकॅडमीने अंतिम फेरीत प्रवेश केला. हर्षदीप साठे सामन्याचा मानकरी ठरला.
डोणगाव येथील पुष्प अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य सामन्यात त्यांनी निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीचा सुपर ओव्हरमध्ये 12 धावांनी पराभव केला. निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकांत सर्वबाद १८७ धावा केल्या. त्यात अनिश बिरोळी ३२ व पूर्णचंद्रने २८ धावा केल्या. युनायटेड क्रिकेट अकॅडमीकडून अर्जुनने ३४ धावांत ३ बळी घेतले. युनायटेड अकॅडमीने विजयासाठी १८७ धावांचा पाठलाग करताना ५० षटकात ७ बाद १८७ धावा केल्या. हा सामना बरोबरीत सुटल्याने सूपर ओव्हर खेळविण्यात आला. युनायटेडने प्रथम फलंदाजी करताना १ षटकात १६ धावा केले. त्याचा पाठलाग करताना निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीने ४ धावा केल्या.
युनायटेडकडून फलंदाजी करताना हर्षदीप साठे ५६ धावा व अभय अजलापूरकर नाबाद ३२ धावा केल्या. निलेश गायकवाड संघाकडून गोलंदाजी करताना अथर्व पाटीलने २७ धावात ३ गडी बाद केले. हर्षदीप साठे सामनावीर ठरला.
















