उत्तरप्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यात भरधाव डंपरची ई-रिक्षाला धडक बसून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार चित्रकूटमधील शहर कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कपसेठी-अमानपूर राष्ट्रीय महामार्गावर आज, मंगळवारी सकाळी भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने (ट्रक) एका ई-रिक्षा वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. हे सर्व अपघातग्रस्त भाविक असून आटोरिक्षाने चित्रकूटला निघाले होते. या अपघातासंदर्भात चित्रकूट पोलिस अधिक तपास करीत आहेत.