बा-हाळी / नांदेड – येथील विद्या विकास शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक तथा माजी जि. प. सदस्य वै. मार्तंडराव उर्फ भाऊसाहेब व्यंकटराव देशपांडे यांच्या आठव्या पुण्यस्मरण निमित्य दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यास विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विद्या विकास विद्यालय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई देशपांडे अम्मा यांनी केले आहे.
मुखेड तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व तथा प्रगतीशील शेतकरी तथा मा.जि.प.सदस्य वै .भाऊसाहेब देशपांडे यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी वै.भाऊसाहेब देशपांडे प्रतिष्ठान बा-हाळी च्या वतीने सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यदायी, असे वेगवेगळे उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते याही वर्षी आठव्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित केला आहे.
दिनांक २९डिसेंबर २०२५रोजी सकाळी ११ वा. विद्या विकास विद्यालयाच्या प्रांगणात वै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास श्रीमती विजयताई देशपांडे ,मल्हार देशपांडे, मूरारजी देशपांडे राजन देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी व पालक मेळाव्याची सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ बा-हाळी परिसरातील जास्तीत जास्त पालकांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन विद्या विकास संस्थेच्या वतीने अध्यक्षा, प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.


























