सोलापूर – प्रसिध्द मल्टी स्पेशालिटी अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूरचा 44 वा वर्धापन दिन दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहाने साजरा करण्यात आला.
सुरुवातीस डॉ. श्री. व सौ. नम्रता आपटे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
तद्नंतर मा.चेअरमन श्री.बिपीनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मा.व्हा.चेअरमन डॉ.विजय पाटील, मा.संचालक श्री.चंद्रशेखर स्वामी, मा.संचालक श्री.अशोक लांबतुरे, मा.संचालक श्री.विलास पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रशांत औरंगाबादकर, प्रशासकीय अधिकारी श्री.सचिन बिज्जरगी यांच्या हस्ते मेल वॉर्ड, गायनेक वॉर्ड व बालरुग्ण विभागातील रुग्णांना फळेवाटप करण्यात आले.
संस्थेच्या 44 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अश्विनी सहकारी रुग्णालय कामगार युनियन यांच्या सहकार्याने रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 75 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. या शिबिराकरिता अश्विनी ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले.


























