नरखेड :- मोहोळ तालुक्यातील भोयरे येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाचे शुक्रवार दि 2 जानेवारी 2026 ते 3 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील भोयरे गाव नेहमी चर्चेत असते ते म्हणजे आई जगदंबेच्या मंदिरामुळेच.भोयरे गावाच्या उशाला उंच डोंगरावरीत हेमाडपंथी श्री जगदंबा देवीचे प्राचिन मंदिर असुन या देवीच्या अख्यायिका इतिहासाच्या पावलोपावली आपणास वाचायला, पहायला मिळतात. भोयरे गावातीलच नव्हे तर संपुर्ण परिसरातील भाविक – भक्ताची देवीवर अफाट श्रद्घा आहे.या जगदंबा देवीची याञा जरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला असते.ही याञा भोयरेच्या पावननगरीत उत्साहात संपन्न होत आहे.
या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे शुक्रवार दि 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यत देवीचा भोगीचा कार्यक्रम, आरती, महापूजा गावातील आराधी मंडळाच्या हस्ते, सायं सहा ते सात शोभेचे दारूकाम, सायं सात ते नऊ श्री जगदंबा देवीचा छबीना व पालखीची मिरवणूक होणार आहे. शनिवार दि 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत नामवंत मल्लांच्या कुस्त्या जगदंबा केसरी कुस्ती स्पर्धा 2026, तर तर रात्री आठ ते बारा वाजेपर्यत सारेगमप डान्स म्युझीकल पार्टी कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

























