तभा फ्लॅश न्यूज/परतूर : गजानन स्टोन क्रेशर लावणी येथे टाटा कंपनीचा हायवा कामासाठी लावण्यात आलेला होता. सदरचा दिनांक 16/08/2025 रोजी मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेलेला होता. पोलीस ठाणे परतुर येथील अधिकारी अंमलदार सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एक तपास पथक नेमलेले आहे.
सदरचा चोरीस गेलेला हायवा धारुर केज मार्गे जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावरुन भागवत गुन्हा उघकडीस आणण्यासाठी तात्काळ पथक रवाना केलेले होते.
पथकातील अधिकारी अंमलदार यांनी धारुर केज मार्गे जाणा-या रोडवर हायवाचा पाठलाग करीत असतांना सदरचा हायवा हा चोरट्यांनी सुयश हिंदुस्तान पेट्रोल पंप केज जि.बीड येथे सोडुन पळुन गेलेले आहेत. सदर चोरीस गेलेला हायवा किंमती 40,00,000/- रुपयांचा जप्त करण्यात आलेला असुन चोरुन नेलेल्या चोरट्यांचा शोध चालू आहे.