पंढरपूर – नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, भाजपा गटनेते भागवत बडवे आणि शहर विकास आघाडीचे गटनेते सुजितकुमार सर्वगोड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की. उपनगराध्यक्ष व गटनेते यांना नागरिकांचे प्रश्न सोडवावे म्हणून स्वतंत्र दालन उपलब्ध करून द्यावे म्हणून मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने दालन उपलब्ध करून दिल्या बद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे सर्व नगरसेवकांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच उपनगराध्यक्ष व गटनेते यांना स्वतंत्र. कार्यालय हे केवळ नावापुरते नसून, ते नगरसेवक आणि नागरिक यांच्यातील भक्कम दुवा ठरेल तसेच प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागात नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते, पाणीपुरवठा पाईपलाईन, ड्रेनेज, दिवाबत्ती किंवा इतर कोणतीही विकासकामे करावी लागणार आहेत ती कामे नगर परिषद प्रशासनाकडे स्वतःच्या लेटर पॅडवर मागणी करावी त्याची प्रत गटनेत्यांकडे द्यावी.
नगरसेवकांच्या प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याची व शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल हे शहर माझे व तुमचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी माझ्या स्वतःच्या निधीतून तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही असे सांगितले.
या बरोबरच हे लोकशाहीचे हक्काचे दालन आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजात सुलभता येण्यासाठी या स्वतंत्र दालनाचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी गटनेते भागवत बडवे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर यांनी विचार व्यक्त केले.
या उद्घाटन समारंभस मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गट नेते सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, धर्मराज घोडके,कुसुम परचंडे, विनायक संगीतराव, लखन चौगुले, संध्याताई शेंबडे, अर्चना शिंदे, उज्वला भालेराव, तेजश्री पानकर, शीलाताई माने सौरभ थिटे, विशाल मलपे, बालाजी मलपे, माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, इब्राहिम बोहरी,राहुल परचडे, शरद माने विक्रम शिरसट, सिकंदर ढवळे, मालोजी शेंबडे,अशोक शिंदे, कृष्णा कवडे, वैभव भोसले, निखिल परचंडे, रोहित पानकर, गुरु दोडिया उमेश सर्वगोड, यल्लाप्पा कबाडे, विकी अभंगराव उपस्थित होते.

























