Saturday, June 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“सगळं संपलं होतं… पण एका हलक्या हालचालीने दिली नव्या आयुष्याची आशा”

तरुण भारतbyतरुण भारत
March 18, 2026
in editor
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीपूर्ण सर्व्हायकल स्पाइन सर्जरी (मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया) यशस्‍वीपणे पूर्ण केली आहे. या शस्त्रक्रियेमुळे श्री. राजीव वरवडे यांना पुन्हा उभे राहणे आणि चालणे शक्य झाले आहे. एका भीषण अपघातात त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्यावर दबाव आला होता आणि त्यांना क्वाड्रिप्लेजिया (चतुष्पाद अर्धांगवायू म्‍हणजेच सर्व हात-पाय निकामी होणे) झाला होता. उपचारांमधील विलंब आणि प्रकृतीची खालावलेली स्थिती पाहता जसलोक हॉस्पिटलमध्ये मिळालेले हे यश खरोखर चमत्कार आहे.

श्री. वरवडे कामावरून घरी परतत असताना वाटेत अचानक एक अडथळा आल्याने त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. या धडकेमुळे त्यांच्या मानेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले आणि पाठीचा कण्यावर मोठा दबाव आला, परिणामी त्यांच्या खांद्याखालील संपूर्ण शरीर अर्धांगवायूने निकामी झाले. अशा प्रकारच्या गंभीर दुखापतींमध्ये मृत्यूचा धोका खूप जास्त असतो आणि मज्जासंस्थेचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता असते (उदा. प्रसिद्ध ‘सुपरमॅन’ फेम अभिनेता क्रिस्‍तोफर रीव्ह यांना झालेली दुखापत).

त्यांच्या भागातील प्रमुख रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. ही दुखापत कायमस्वरूपी असून शस्त्रक्रियेचा कोणताही उपयोग होणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. परिस्थिती अधिकच बिकट झाली, कारण ही शस्त्रक्रिया जीवघेणी ठरली असती आणि रुग्णाला दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर अवलंबून राहावे लागण्याची दाट शक्यता होती. पुढील १५ दिवस ते कोणत्याही निश्चित उपचारांविना घरीच राहिले. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती, हात-पाय हलवता येत नव्हते आणि घरी लहान मुले असताना समोर फक्त अनिश्चित भविष्य आणि मृत्यू दिसत होता.

कुटुंबिय उपचारांचे पर्याय शोधत असताना त्यांचा संपर्क जसलोक हॉस्पिटलमधील मिनिमल इन्‍वेसिव्‍ह सर्जरी व स्‍पाइनल डिफॉर्मिटी सर्जरीचे कन्सल्टंट स्पाइन सर्जन डॉ. मनिष कोठारी यांच्याशी झाला. बीड जिल्ह्यातील अशाच गुंतागुंतीच्या रुग्णांवर डॉ. कोठारी यांनी जसलोक हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार केल्याचे त्यांनी ऐकले होते. डॉ. कोठारी यांनी सुरुवातीला व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे श्री. वरवडे यांची तपासणी केली. या तपासणीत दुखापतीच्या खालच्या दोन्ही हातांना पूर्णपणे अर्धांगवायू झाला असल्याचे आणि पायांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून आले. पण, डॉक्‍टरांना डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये झालेली एक अतिशय सूक्ष्म हालचाल दिसली. यावरून संकेत मिळाले की, पाठीचा कण्याला झालेली दुखापत कायमस्वरूपी नसावी आणि रुग्ण पुन्हा बरा होऊ शकतो. ही एक छोटी, पण अत्यंत महत्त्वाची आशा होती.

श्री. वरवडे यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, तेव्हा उपचारांमधील विलंबामुळे त्यांची आधीच गंभीर असलेली प्रकृती अधिक गुंतागुंतीची झाली होती. या शस्त्रक्रियेमध्ये जगण्याची शक्यता कमी किंवा दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर अवलंबून राहावे लागणे, अशी मोठी जोखीम होती. शस्त्रक्रियेतील धोके आणि त्यातून मिळणाऱ्या संभाव्य निकालांबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

पाठीचा कण्यावरील दबाव कमी करण्यासाठी आणि मणक्याचा जखमी झालेला भाग स्थिर करण्यासाठी डॉक्टरांच्या टीमने ही अत्यंत जोखमीची सर्व्हायकल स्पाइन सर्जरी केली. शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीच्या काळात मज्जासंस्थेमध्ये सुधारणेची सकारात्मक लक्षणे दिसून आली. अवघ्या दोन आठवड्यांत श्री. वरवडे आधार घेत चालू लागले. आज तीन महिन्यांनंतर, ते कोणाच्याही मदतीशिवाय स्‍वत:हून चालत आहेत आणि आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट स्पाइन सर्जन डॉ. मनिष कोठारी म्हणाले, “राजीव यांच्या केसमधील आव्‍हानात्‍मक बाब म्‍हणजे, शस्त्रक्रिया तंत्रज्ञानदृष्ट्या यशस्वी झाली तरीही ते आयुष्यभर व्हेंटिलेटरवर अवलंबून राहण्याची दाट शक्यता होती. ऑपरेशन थिएटरमध्‍ये प्रत्येक निर्णय घेताना या जोखमीचा विचार करावा लागत होता. आम्‍ही पाठीच्या कण्यावरील दबाव कमी करण्‍यासोबत त्यांना स्वतःहून श्‍वास घेता यावा आणि स्वतंत्र आयुष्य जगता यावे, यासाठी संधी देण्यावर लक्ष केंद्रित केले होते. आज त्यांना व्हेंटिलेटरच्या आधाराशिवाय बरे झालेले पाहताना खूप आनंद होत आहे.”

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्हणाले, “राजीव यांच्‍या केसमधून निदर्शनास येते की, टर्शियरी केअर सेंटर्सनी अशा केसेसची हाताळणी करण्‍यासाठी सुसज्‍ज असले पाहिजे. इतर हॉस्पिटल्‍स जोखमीमुळे उपचार करण्यास नकार देतात, तेव्हा योग्य तज्ज्ञ, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि क्रिटिकल केअर सपोर्ट असलेल्या संस्थांनी पुढे येणे अनिवार्य असते. या केसमध्ये मिळालेल्‍या यशामधून आमचा समन्वित, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आणि अत्यंत आव्हानात्मक केसेसना यशस्वीपणे हाताळण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

श्री. राजीव वरवडे म्हणाले, “अपघातापूर्वी मी अतिशय सक्रिय होतो, पण अपघातानंतर अचानक माझी हालचाल पूर्णपणे थांबली आणि माझे हात-पाय निकामी झाले. त्यानंतरचे दिवस

अनिश्चितता आणि भीतीने भरलेले होते, विशेषतः आम्हाला या दुखापतीच्या गांभीर्याबद्दल सांगण्यात आले तेव्‍हा आम्‍ही खूप अस्‍वस्‍थ झालो. जसलोक हॉस्पिटलमध्ये येणे हा आमचा शेवटचा आशेचा किरण होता. इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, पण मी पहिल्यांदा आधाराने उभा राहिलो, तो माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत भावूक क्षण होता. आज पुन्हा स्वतःच्या पायावर चालताना पाहून मला नवीन जीवनदान मिळाल्‍यासारखे वाटते.”

या केसमधून जसलोक हॉस्पिटलची गुंतागुंतीच्या आणि अत्यंत जोखमीच्या स्पाइनल ट्रॉमा (मणक्याच्या गंभीर दुखापती) शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची क्षमता दिसून येते. तसेच, आशा धूसर असते अशा कठीण परिस्थितीत रुग्णाची हालचाल पूर्ववत करून त्यांना नवे आयुष्य देण्याची क्षमता देखील निदर्शनास येते.

Post Views: 41
Previous Post

ग्राहक म्हणून नेहमी जागरुक रहा  –  तहसीलदार सचिन लंगुटे

Next Post

उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे आणि सुजितकुमार सर्वगोड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे आणि सुजितकुमार सर्वगोड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे आणि सुजितकुमार सर्वगोड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

June 19, 2026
इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

June 19, 2026

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 19, 2026

तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी राज्य सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

June 19, 2026

आयटीआय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार संजय केनेकर यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा  

June 19, 2026
ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला आखेर  तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय

ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला आखेर  तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय

June 19, 2026
शिवसेना वर्धापन दिन निमित्य महारती

शिवसेना वर्धापन दिन निमित्य महारती

June 19, 2026

सीसीटीव्ही चा प्रश्न ऐरणीवर, चोरीचा छडा लावण्याचे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान?

June 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0922583

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697