सोलापूर : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर शहर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली असून अध्यक्षपदी विकास कस्तुरे , कार्याध्यक्षपदी सचिन जाधव, उपाध्यक्षपदी विक्रम इंगळे, तर सचिव पदी शिवाजी सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रशांत कटारे यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. त्यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना राजा माने सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
राजा माने सर यांनी आपल्या मनोगतात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची संपूर्ण देशभरात वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
ही आहे नूतन कार्यकारणी
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष: प्रशांत कटारे
पश्चिम महाराष्ट्र संघटक : परशुराम कोकणे
रवींद्र जोगीपेठकर : सरचिटणीस
इमरान सगरी : उपाध्यक्ष
चंदन बोल्लू : खजिनदार
शिवाजी सावंत : सचिव
शहानवाज शेख : संघटक
अकबर बागवान : प्रसिद्धीप्रमुख

























