तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
27 जुलैअंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील १ ८
वर्षीय तरूण विश्वजीत पंडित गावडे याचे अल्प आजाराने गुरुवारी पहाटे 3च्या दरम्यान दुःखद निधन झाले. वडीगोद्री येथील विश्वजीत पंडित गावडे यास ताप आला होता
बुधवारी रात्री जास्त ताप आल्याने त्यास हॉस्पिटल मध्ये नेत असताना गुरूवारी पहाटे 3 वाजता त्याची प्राणज्योत मालवली आहे. विश्वजीत पंडित गावडे याच्या पश्चात आई, वडील, आजी, दोन बहिणी, मेव्हणे, तीन चुलते, तीन चुलत्या, चुलत भाऊ, बहीण मामा मामी असा मोठा परिवार आहे. वडीगोद्री येथील शिवसेना अंबड उपतालुकाप्रमुख श्री पंडीत भाऊ गावडे यांचा तो मुलगा होत.