*स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख विकास जाधव यांचा उपविगागीय कार्यालयामार्फत संबधीत विभागाला इशारा.
भोकरदन : आरोग्य विभागाच्या परीपत्रकानुसार जालना जिल्हातील भोकरदन येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली असतांनासुद्धा आतापर्यंत बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.
भोकरदन तालुक्यातील आपल्या तालुक्यातील असंख्य गरीब घरातील रुग्ण सदरील रुग्णालयात आजपर्यंत उपचार घेत आलेले आहेत परंतु आता रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराला मुकावे लागत आहे.
शहरातील उपजिल्हा दर्जाच्यख रुग्णालयाच्या बांधकामाला अद्याप पर्यंत सुरुवात न झाल्याने राजकीय लोकप्रतिनीधींची श्रेयवादासाठी लढाई सुरु असल्यानेच बांधकामाला सुरुवात होत नाहीये ना?
अशा चर्चांना उधाण आले असुन सद्धस्थीतीत रुग्णालयात एकच रूग्णवाहीका असुन ती ही बंद अवस्थेत राहते या आणि अशा अनेक समस्या रुग्णालयांच्या असुन या समस्याचे निवेदन संबधीत प्रशासनास दिले असुन या निवेदनाचि दखल घेऊन सबंधीत बांधकाम तात्काळ चालू न केल्यास व रुग्णवाहीका कार्यान्वीत न केल्यास स्वराज्य संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख विकास जाधव यांनी दिला आहे.