– कोल्हापूर नाक्यावर रास्ता रोको
पुणे, 28 जून (हिं.स.) हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विकृत मनोवृत्तीच्या माथेफिरुने विटंबना केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने पुणे-बंगळुरु महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. काही काळानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन रास्तारोको थांबवण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.., तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय.. जय भवानी… जय शिवाजी…, या ना अशा घोषणा देत येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा दत्त चौकातून तहसीलदार कार्यालयासमोरुन कोल्हापूर नाक्यावरुन पंकज हॉटेल समोरील पुणे-बंगळुरु महामार्गावर नेण्यात आला. तिथे रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलनकर्ते बसल्याने त्या परिसरातील वाहतूक खंडित झाली होती.