बार्शी – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व समता बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित विश्वरत्न चषक स्पर्धेत. खुले गटात सिद्धार्थ कोठारी यांनी प्रथम पारितोषिक मिळाले.
तसेच शंकर साळुंके, विजय पांगुद्वळे, चंद्रकांत पवार, दत्तात्रय गोरे, प्रसन्नजित जांभळे, संवी गोरे, आदिराज मेहेत्रे यांनी अनुक्रमे २,३,४,५,६,७,८ पारितोषक मिळाले.
तसेच १५ वर्षे खालील गटांमध्ये अनन्या उलभगत यांनी प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच साईराज गंभीरे, नोमान करमालकर, उमेर शेख, अथर्व बासर्गीकर, पर्व अग्रवाल, शुभम कदम, हर्ष कांबळे यांनी अनुक्रमे २,३,४,५,६,७,८ पारितोषिक मिळाले. तसेच १० वर्षाखालील गटांमध्ये पृथा ठोंबरे याने प्रथम स्थान मिळवले व तसेच मितांश सिंघवी, वेदांत क्षीरसागर, अनुश्री गोरे, स्नेहा लोळगे, प्रेम कबाडे,भव्या ओहळ, प्रीती लोळगे यांनी अनुक्रमे २,३,४,५,६,७,८ पारितोषिक मिळाले.
तसेच प्रत्येक गटामध्ये ९ वे बक्षीस मुलींसाठी उत्तेजार्थ देण्यात आले. त्यामध्ये खुल्या गटामध्ये पद्मजा शहा, १५ वर्ष वयोगटामध्ये सान्वी लाडे व १० वयोगटामध्ये अन्वी दरपे याना पारितोषिक मिळाले.























