सोलापूर : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सोलापूर महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारित कार्यक्रम-२०२५ जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार खालीलप्रमाणे सुधारित कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे: राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस विधानसभेच्या मतदार यादी वरून महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक करीता तयार केलेली प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरीता प्रसिद्ध करण्यासाठी दि.14 नोव्हेंबर 2025 , प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दि. 22 नोव्हेंबर 2025, प्रारूप मतदार याडीवरून दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या आधिप्रामाणित करून प्रसिद्ध करणे 6 डिसेंबर 2025, मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करणे 8 डिसेंबर 2025, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे – 12 डिसेंबर 2025 याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
















