परभणी / जिंतूर – जिंतूर तालुक्यातील लिंबाळा गावची सुपुत्र डॉक्टर पंडितराव दराडे यांची जिंतूर संजय गांधी निराधार शासकीय समितीवर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचे आदेश परभणी जिल्हा अधिकारी यांनी त्यांना देण्यात आले.
राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे अत्यंत विश्वासू असलेले डॉक्टर पंडितराव दराडे यांची संजय गांधी निराधार समितीवर निवड करण्यात आली आहे. डॉक्टर पंडित तरडे हे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सोबत असून काम केले तसेच नगरपरिषद जिंतूर चे ते नगराध्यक्ष, नगरसेवक होते. त्यांचे ग्रामीण भागातील जनतेशी मोठा संपर्क आहे व तसेच भाजपाचे.
याचबरोबर जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात त्यांनी बोर्डीकर कुटुंबासोबत राहून मेघनाताई यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी जोमाने काम केले त्यांच्या कार्याची दखल घेत पालकमंत्री यांनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे जिंतूर शहरांमध्ये भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी आतिशबाजी करत स्वागत केले.





















