सोलापूर : प्रभाग 5 बाळे हद्दवाढ परिसरातील महाराष्ट्र शासन जिल्हास्तर नगरोत्थान योजना अंतर्गत वारद फार्म -ग्रीन्स अपार्टमेंट – पुना नाका नाला भागात ड्रेनेज लाईन टाकणे कामाचा शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तर नगरोथान योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सोलापुर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या माध्यमातून माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर शहरातील हद्दवाढ भागासह इतर ठिकाणी ड्रेनेज टाकण्याकरिता शासनाकडे निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती त्यानुसार सन 2020 -24 च्या अंदाजपत्रकामध्ये 363 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता.
या अनुषंगाने बाळे परिसरातील वारद फार्म व ग्रीन अपार्टमेंट या भागातील नागरिकांनी या भागात ड्रेनेज लाईन व सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरत होती. यानुसार माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, कृषिमंत्री यांच्या मार्गदर्शना नुसार संबंधित विभागास वारद फार्म ते ग्रीन्स अपार्टमेंट ते नाला परिसर या भागातील अडचण दूर करण्याबाबत पाठपुरावा केला. या कार्यक्रम प्रसंगी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























