मोडनिंब – येथील मोडनिंब (ता.माढा) शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेच्या कामाचे भूमिपूजन आज पार पडले. या भागातील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून या कामाची मागणी होत होती. नागरिकांची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे यांच्या पुढाकारातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
या योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी सागर गिड्डे, कुरण गिड्डे, बालाजी पाटील, अण्णासाहेब कदम, अनिल शिंदे, अमित कोळी, राहुल पाटील, उदय जाधव,राजेश निंबाळकर, बच्चू गोरे, संजीव शिंदे , हनुमंत यादव, अजित खडके, एकनाथ शिंदे, पिंटू पाटोळे, बबलू जाधव, परशुराम जाधव, अरुण तोडकरी, ऋत्विक तोडकरी, सतीश कुंभार, सोमनाथ शिंदे, नामदेव गिड्डे, किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला पत्रकार बांधव मोडनिंब प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रथमेश पवार उपस्थित होते.
या योजनेमुळे प्रभागातील नागरिकांना स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या योजनेमुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन होणार आहे.

















