Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in marathwada
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जालना शहरात दि.18 आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर होणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न आहे. जालनेकरांनी या दोन दिवसीय सांस्कृतिक मेजवाणीचा लाभ घ्यावा. तसेच आजच्या पिढीने शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर वंदना मगरे यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व  शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्ष विश्वंभर तिरुखे,  सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, अशोक पडूळ, किशोर मरकड, तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार तुषार निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहेत. जालना शहरात पूर्वी जेव्हा वाहने नव्हती, तेव्हा शिवजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात बैलगाडीतून निघत असे. आज काळ बदलला आहे, तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. आता मोटारगाड्या आणि आधुनिक वाजंत्रीसह मिरवणुका निघतात. काळानुसार साजरीकरणाची पद्धत बदलली असली, तरी शिवरायांवरील निष्ठा तीच आहे. जयंतीच्या उत्सवापुरते मर्यादित न राहता, महापुरुषांचे उदात्त विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजच्या सोहळ्यात चिमुकल्यांना शिवरायांच्या वेशभूषेत पाहून मनाला विशेष समाधान वाटत आहे. अशा संस्कारांतूनच उद्याची पिढी घडणार आहे. असे प्रतिपादन उपमहापौर राजेश राऊत यांनी केले.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या महान कार्याचे स्मरण व्हावे आणि तो वारसा जपला जावा, याच मुख्य हेतूने या दोन दिवसीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी शिवरायांना अभिवादन करत सर्व जालनेकरांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. गुरुवार दि.19 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांच्या शाहिरी शिवदर्शन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातही शिवरायांच्या शौर्याच्या अनेक गाथा मांडल्या जाणार असल्याने जालनेकरांनी या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘जागर शिवशाहीचा’ सादरीकरणाने जालनेकर भारावले;

शाहिरी कडाडली आणि अंगावर शहारे उमटले..!

 

बुधवार दि.18 फेब्रुवारी रोजी शाहीर अजिंक्य लिंगायत व त्यांच्या 11 कलावंतांनी सादर केलेल्या ‘जागर शिवशाहीचा’ या कार्यक्रमाने जालनेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  डफावर थाप पडली, तुणतुण्याचा सूर छेडला गेला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही घ्या मानाचा मुजरा…’ या ललकारीने टाऊन हॉलचा परिसर शिवमय झाला.

छत्रपती शिवरायांच्या बाललीलांचे वर्णन करणाऱ्या ‘गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ या शिवपाळण्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो ‘छत्रपती शिवाजी जाहले’ हे शिवराज्याभिषेक गीत. या गीतावेळी शाहिरांचा बुलंद आवाज आणि वाद्यांची साथ यामुळे अंगावर रोमांच उभे राहिले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गोंधळाने झाली. ‘गोंधळाला ये…’ आणि ‘दार उघड बया आता दार उघड…’ या गीतांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. केवळ गाणीच नव्हे, तर विस्मृतीत चाललेल्या ‘तुमडी’ या कलाप्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला’ या गाण्यासोबतच कलाकारांनी सादर केलेली युद्धकला आणि लढतीची प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षक थक्क झाले. महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात शाहिरी परंपरेतून शिवरायांचे शौर्य मांडण्यात आले.

प्रत्येक पोवाड्यागणिक सभागृहात होणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष वातावरणात नवचैतन्य निर्माण करत होता. तर सुरातून उलगडणारा शिवरायांचा देदीप्यमान इतिहास अनुभवण्यासाठी जालनेकरांनी सभागृहात गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्‍त त्यांच्या कार्यकतृत्वावर व शौर्यावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे  मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले.

गुरुवारी शाहिरी शिवदर्शन

गुरुवार दि.19 फेब्रुवारी 2026 रोजी जालना टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झी मराठी, सोनी मराठी आणि कलर्स मराठी फेम टीव्ही स्टार प्रसिध्द शाहिर  रामानंद उगले, माधवी उगले-माळी, शाहीर अप्पासाहेब उगले आणि 16 सहकलावंताचा समुह  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम शाहिरी शिवदर्शन सादर करणार आहेत.

Post Views: 22
Previous Post

आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

Next Post

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

ताज्या बातम्या

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान – प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

February 19, 2026

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

February 19, 2026

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

February 19, 2026

आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

February 19, 2026

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न

February 19, 2026

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजारांचा दंड

February 19, 2026

शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा व व्याख्यानाचा कार्यक्रम

February 19, 2026

प्रभाग २२ मध्ये १४ लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन; आश्वासनांपासून कृतीकडे विकासाची वाटचाल

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686931

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697