महेंद्रसिंग धोनी या आयपीएलमध्ये रविवारी प्रथमच फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी मैदानातील प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. धोनीच्या आगमनाचा हा व्हिडिओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.
ही गोष्ट घडली ती १७ व्या षटकात. हे १७ वं षटक दिल्लीचा मुकेश कुमार टाकत होता. या १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मुकेश कुमारने शिवम दुबेला बाद केले. शिवम बाद झाला धोनी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. धोनी मैदानात उतरला आणि त्यावेळी त्याच्या नावाचा कच जयघोष सुरु झाला. संपूर्ण मैदानात फक्त धोनी… धोनी… हा नारा घुमत होती. चेन्नईचा संघ खरं तर त्यावेळी अडचणीत होता. पण धोनी मैदानात आल्यावर सर्व काही ठीक करेल, हा विश्वाच चेन्नईच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. धोनीच्या नावाचे बरेच फलक मैदानात झळकाताना पाहायला मिळत होते. धोनी मैदानात आल्यापासून तो खेळपट्टीवर पोहोचेपर्यंत धोनीच्या नावाचा नारा सुरु होता. धोनी मैदानात येऊन रवींद्र जडेजाला भेटला. त्यानंतरही हे नारे सुरुच होते. धोनीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं.