स्वातंत्र्यानंतर 1947 साली धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मग तेव्हाच भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केले नाही.. ? असा सवाल कंगना राणावत हिने उपस्थित केलाय. हिमचाल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी देण्यात आली. येथे एका प्रचार सभेला संबोधित करताना तिने हा प्रश्न उपस्थित केलाय.
यावेळी कंगना म्हणाली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष आहेत. आमच्या पूर्वजांनी मुगलांची आणि त्यानंतर इंग्रजांची गुलामी सोसली आहे. तसेच काँग्रेसचे कुशासनही पाहिलेय. मात्र आपल्याला 2014 मध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. विचार करण्याचे स्वातंत्र्य, सनातनच्या पालनाचे स्वातंत्र्य, धर्माचे स्वातंत्र्य, या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे स्वातंत्र्य मिळालंय. तुम्ही धर्माच्या आधारावर 1947 मध्ये पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवले होतं. मग भारताला हिंदू राष्ट्र का बनवले नाही ? आता आम्ही या देशाला हिंदू राष्ट्र बनवू, असे विधान कंगना राणावत हिने केले. यापूर्वीही कंगनाने अशाच प्रकारचे विधान केले होते. देशाला खरे स्वातंत्र्य 1947 नव्हे तर 2014 मध्ये मिळाल्याचे तिने म्हंटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ हे खरे स्वातंत्र्य असल्याचा दावा कंगनाने केला होता. कंगना राणावतच्या विरोधात काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह रिंगणात असून. मंडी येथे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे.