सांगोला – अज्ञात कारणाने पत्नीचा तर गळफास घेऊन पतीचा मृत्यू झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील कटफळ येथे गुरुवार दि.२२ जानेवारी रोजी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, पत्नी मंडाबाई श्रीमंत मिसाळ, वय-५४ वर्षे, रा.कटफळ, ता.सांगोला, जि.सोलापूर ह्या त्यांच्या रहाते घरी अज्ञात कारणावरुन बेशुद्ध अवस्थेत मिळुन आल्या. तसेच पती श्रीमंत मारूती मिसाळ वय-५८ वर्षे, रा.कटफळ, ता.सांगोला, जि.सोलापूर हे त्यांच्या शेतात सुबाभळीच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. त्या दोघांना बाळासाहेब मिसाळ रा.कटफळ ता.सांगोला यांनी उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे उपचारास दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन ते उपचारा पुर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले.
याबाबत बाळासाहेब मारूती मिसाळ, वय- ५६ वर्षे, रा.कटफळ, ता.सांगोला, जि.सोलापूर यांनी सांगोला पोलीस ठाणे येथे खबर दिली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.

























