[] भाजपा संयोजक पद बदलण्यास लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार- उमाकांत भोरे []
हदगाव तालुका प्रतिनिधी :-
हदगाव – हिमायतनगर भाजपा संयोजक पद हे मागच्या काही महिन्यापासून रिक्त होते त्या ठिकाणी दोन्ही तालुक्यातीलच कार्यकर्त्यांमधून निवड होणे अपेक्षित असताना अचानकपणे हदगाव – हिमायतनगर तालुक्यापासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या तालुक्यास हे पद भेटल्यामुळे भाजपा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत असून मोठ्या प्रमाणात असंतोष उफळून आला आहे. हे पद तालुक्यातीलच कार्यकर्त्यांना देऊन न्याय द्यावा अशी मागणी करण्याकरिता भाजपाचे तालुका सरचिटणीस उमाकांत भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पश्चात तत्कालीन भाजपाच्या नेत्या तथा हदगाव- हिमायतनगर संयोजक सूर्यकांता पाटील यांनी आपल्या सदस्य तत्त्वासह संपूर्ण पदाचे राजीनामे दिले होते तदनंतर दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांना असा विश्वास होता की, स्थानिक कार्यकर्त्यांमधूनच या पदासाठी निवड केली जाईल पण काही दिवसापूर्वी संयोजक पदासाठी दूरवरच्या तालुक्याला संधी दिली असल्याकारणाने इथल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधला असंतोष उफळून आला असून त्यानिमित्ताने भाजपाचे सरचिटणीस उमाकांत भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन या निवडीमुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुका तदनंतर मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज संस्था या निवडणुकीत पक्षास फटका बसण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही तरी पक्षास फायदा होऊन दोन्ही तालुक्यात वातावरण अनुकूल राहण्यासाठी त्या ठिकाणी स्थानिक तालुक्यातूनच संधी देण्यात यावी अशी मागणी या भेटीत करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले. आता कुठेतरी तालुक्यात भाजपाची चांगली पकड मजबूत निर्माण होत असताना अशा प्रकारचे जर बाहेरील दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती लादण्यात येईल तर राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे सुद्धा पदाधिकारी हे बोलवून दाखवत आहेत.