सोलापूर – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेला प्रचार दौरा अतिशय आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात सुरु आहे .
इंद्रजित पवार यांनी बी बी दारफळ मतदार संघात जोरदार प्रचार दौरा सुरु केला आहे . नागरिकांचा प्रामाणिक प्रतिसाद आणि मनापासून केलेले स्वागत हे भरपूर सकारात्मक आणि आनंददायी असल्याचं चित्र दिसत आहे .
या भेटीदरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक , महिला , युवकांशी इंद्रजित पवार यांनी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी , मूलभूत सुविधा , स्थानिक प्रश्न तसेच भविष्यातील विकासाबाबतच्या अपेक्षा समजून घेतल्या .
संपूर्ण मतदार संघातील समस्या तात्पुरत्या नाही तर कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र नियोजन व प्रभावी पाठपुरावा करण्याचा आणि विकासाच्या बाबतीत हा भाग मागे राहणार नाही याचा ठाम निर्धार पवार यांनी व्यक्त केला .
तरुण चेहरा व ‘ इंद्रजित ‘ यांची स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणारी , लोकांशी जोडलेली आणि जमिनीवर काम करणारी कार्यपद्धती आम्हाला अतिशय आवडली असल्याचं मत नागरिकांनी मांडलं .
हा प्रचार दौरा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता मतदार संघातील नागरिकांशी विश्वासाचं नातं अधिक दृढ करणारा ठरत आहे .
बी बी दारफळ मतदार संघातील नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास , आशीर्वाद आणि वाढता सहभाग पाहता हा दौरा निश्चितच विश्वास देणारा आणि विजयाच्या दिशेने प्रेरणा देणारा ठरत असल्याचा विश्वास इंद्रजित पवार यांनी व्यक्त केलाय .



























