अक्कलकोट – स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी स्वच्छ सुंदर आणि आदर्श भक्ती पीठ व्हावे यासाठी आपण कार्यरत राहणार आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इकरार शेख यांनी केले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इकरार शेख पुढे बोलताना म्हणाले की, मी नेहमी मंत्रलयात जात असतो स्वामी समर्थ भक्तांसाठी सोई सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असून शहरात अस्वच्छता,खड्डे,मोकाट जनावरे दहा दिवसाला पाणी. नगरपालिका शाळांची गुणवत्ता खालावली आहे. भूयारी गटारांची कामे उत्तम दर्जाची झाली पाहिजे. जाणीवपूर्वक रेंगाळलेली रस्त्यांची कामे आदी अनेक समस्या आहेत.यासाठी प्रयत्न करणार आहे.स्वामी समर्थ दर्शनासाठी लाखो भाविक येतात पण चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. या सर्व सोई सुविधा देण्यासाठी मी राष्ट्रवादी शरद पवार गटा कडून उभे आहेत.त्यासाठी आपण जनसेवेसाठी कार्यरत राहण्यासाठी मला मोट्या मतधिक्काने विजय करा अशी ग्वाही इकरार शेख यांनी दिली.
यावेळी दुधनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र इंगळे यांनी आपण दुधनी आदर्श शहर बनविण्याचे अभिवचन दिले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबू सौरभ लांडगे आदी उपस्थित होते.




















