सोलापूर – जीएच रायसोनी यांच्या स्मरणार्थ जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र चेस असोसिएशन व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन अँड कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांनी चॅम्प चेस स्कूलच्या सहकार्याने पहिल्या जीएच रायसोनी जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत पश्चिम बंगालचा आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजित पॉल याने उत्कृष्ट खेळ करत याने नऊ पैकी साडेआठ गुणांसह विजेतेपद आकर्षक चषक व रोख रु ३१००० चे पारितोषिक पटकाविले. तर पुण्याचा ओम लामकाने, कोल्हापूरचा श्रीराज भोसले व ऋषिकेश कबनूरकर यांचे प्रत्येकी आठ गुण झाल्यामुळे सरस बुचोल्स गुणपद्धतीवर ओमने उपविजेतेपद व रोख २५०००, श्रीराजने तिसरा क्रमांक व रोख २०००० व ऋषिकेशने चौथा क्रमांक व रोख १५००० चे बक्षिस मिळविले. पुण्याचा साहिल शेजल याने ७.५ गुणांसह पाचवा क्रमांक व रोख १००००, सोलापूरच्या मानस गायकवाड याने सहावा क्रमांक व रोख ८००० तर साताऱ्याच्या अनिकेत बापट याने सातवा क्रमांक व रोख ७००० पारितोषिक प्राप्त केले.
सोलापुर येथील राजस्व मधील चैत्राली लॉन्स अँड बँक्वेट हॉल मध्ये येथे अतिशय चुरशीने संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण पोलीस उपायुक्त राजन माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार, नामवंत उद्योजक धनंजय बुरुडकर, प्रथमेश बुरुडकर, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशनचे सचिव भुषण श्रीवास, सोलापूरचे अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, व्यवस्थापकीय समिती समितीचे अतुल कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी, उदय वगरे, राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात राजन माने यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्व विषद करत खेळाडूंचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
तसेच विविध वयोगटात मॅथिजन कावीन, अर्णव भस्मे, सिद्धी कर्वे, अमेय शिवपुजे, चंद्रकांत पवार, नितीन अग्रवाल, अभिषेक पाटील, अथर्व अलदर, सृष्टी गायकवाड, विक्रमादित्य चव्हाण, संस्कृती सुतार, सर्वेश पोदार, निखिल मालाटी, विवान सोनी, सृष्टी मुसळे, विजय विश्रुत, पृथा ठोंबरे यांनी उत्कृष्ट खेळ करत आपापल्या गटाचे अव्वल स्थान पटकाविले. तसेच कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी, श्रीधर तावडे, सोलापूरचा सौरभ साहु, अपूर्व देशमुख, आदित्य सावळकर, तामिळनाडूचा एस विश्वेश्वरन, सोलापूरचा विशाल पटवर्धन व कर्नाटकचा आदर्श कदम यांनीदेखील उल्लेखनीय खेळ करत खुल्या गटात अनुक्रमे आठवा ते पंधरावा क्रमांक मिळविला. स्पर्धेत सहभागी झालेल्या दिव्यांग खेळाडूंना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स व रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विजेत्या खेळाडूंना २ लाख रुपयाच्या रोख रकमेसह आकर्षक चषक व भेटवस्तू देण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले. स्पर्धेत प्रमुख म्हणुन आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी यांच्यासह वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, फिडे पंच अमितकुमार टेंभुर्ने, वरिष्ठ राष्ट्रीय पंच, रोहिणी तुम्मा, गणेश मस्कले, विजय पंगुडवाले. भरत वडीशेरला, यश इंगळे, सुधीर वाघमारे यांनी यशस्वीरीत्या काम पहिले.
अंतिम निकाल (अनुक्रमे गुण व बोकोल्स गुणांसह : सर्वोत्तम
१६०१ ते १७०० : केविन माथियाझागन, साहस नारकर, अथर्व रेड्डी
१५०१ ते १६०० : अर्णव भस्मे,सिद्धांत कोठारी,प्रथमेश इंगोले.
१४०० ते १५०० : सिद्धी कर्वे,माधवी देशपांडे, शौर्य मुप्पानेनी.
बिगरमानांकित: अमेय शिवपुजे,स्पर्श लव्हळे, जय अनेराव.
वयस्कर: चंद्रकांत पवार,दिलीप कुलकर्णी,महादेव तुपे.
सोलापूर: नितीन अग्रवाल,साईराज घोडके,स्वप्निल हदगल.
१९ ते ५४ वर्षे: श्रेयस पाटील,रवींद्र निकम, इंद्रजीत महेंद्रकर.
१९ वर्षे मुले: अथर्व अलदर, यशवंत उबाळे, आयान शेख. मुली: सृष्टी गायकवाड,समीक्षा ठाकूर,वैष्णवी येलदी.
१५ वर्षे मुले: विक्रमआदित्य चव्हाण, सानिध्य जमादार, वेद आगरकर. मुली: संस्कृती सुतार,समृद्धी कटले,फराह शेख.
१३ वर्षे मुले: सर्वेश पोद्दार,आदित्य गायकवाड, प्रसेनजीत ईश्वर. मुली: मालती निर्मल, अनन्या उलभगत,अंजली अंकुश.
११ वर्षे मुले: विवान सोनी,श्रेयश कुदळे,वेदांत कुलकर्णी. मुली: सृष्टी मुसळे,हर्षिता भोसले,ईश्वरी माने.
९ वर्षे मुले: विश्रुत विजय,नैतिक होटकर,आशुतोष कुलकर्णी. मुली: ऋता ठोंबरे पृथ्वी हरपुडे.
७ वर्षे मुले: अनिरुद्ध नगरकर,नियान कंदीकटला,कृष्णराज पटाले. मुली: वेदिका कुलकर्णी, ईशा पटवर्धन,स्वरांजली जाधव.


























