जेऊर – कोर्टी (ता.करमाळा) येथील तुषार त्रिशला विलासराव धुमाळ यांची सहाय्यक वन संरक्षक पदी नियुक्ती झाली आहे.या निवडीबद्दल कोर्टी ग्रामस्थांच्या वतीने दुरंदे गुरुकुल येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या वेळी व्यासपीठावर करमाळा खरेदी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, प्रा रामदास झोळ,माजी जि. प सदस्य सविता राजे भोसले, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे,माजी उपसभापती प्रा संजय जाधव ,पो.नि.रणजीत माने, दिनेश मते, स्नेहल मते,नायब तहसीलदार प्रज्ञा केदार,माजी प. स.सदस्य नागनाथ लकडे, डॉ. अमोल दुरंदे, अजित विघ्ने,प्रा. सुहास गलांडे, गोसेवक परमेश्वर तळेकर, कोर्टीचे सरपंच प्रतिनिधी उप अभियंता श्रीरंग मेहेर मेजर हनुमंत जाधव, उपसरपंच पुष्पा जाधव ,माजी उपसरपंच नाना झाकणे,सुनील काळे , केंद्र प्रमुख आदिनाथ देवकाते, मुख्याध्यापक बब्रुवाहन मोरे ,विशाल शहाणे नानासाहेब मोहिते,दादासाहेब शिंदे, सुनील शिंदे भारत क्षिरसागर उपस्थित होते.
या वेळी बोलताना प्रा.रामदास झोळ म्हणाले की स्पर्धा परीक्षेचा निकाल कमी लागत आहे.तरी विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे तसेच नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय शिक्षणाकडे वळावे शासनाच्या विविध शिष्यवृत्ती व अनेक योजनांचा लाभ घ्यावा.
या वेळी युवा नेते शंभूराजे जगताप यांनीही यांचे कौतुक करून त्यांनी केंद्रामध्ये वर्ग -१ची नोकरी मिळवावी व त्यासाठी यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. सुभाष गुळवे, सुहास गलांडे ,कर्जाचे माजी जि.प.सदस्य दादासाहेब कानगुडे ,उपभियंता श्रीरंग मेहेर यांनीही आपले विचार व्यक्त केले.सुत्रसंचालन सचिन नवले यांनी केले तर आभार सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक शहाजी धुमाळ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुमाळ परिवारांनी परीश्रम घेतले .

















