सोलापूर- उद्योग वर्धिनी, स्वावलंबी भारत अभियान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत उद्यम इन्क्यूबेशन सेंटर, यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सक्षमीकरण करिता जोडभावी पेठ भागातील महिलांना स्वयंरोजगार बनवण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.
या प्रसंगी उद्योग वर्धिनीचे प्रमुख चंद्रिका चौहान बोलताना महिलांनी उद्योग क्षेत्रात सक्षमपणे काम केला तर लवकरच भारत माता परम वैभवाकडे जाईल याकरिता सर्वांनी आपल्या प्रयत्नाची पराकाष्टा करावी असे आवहान केले. त्या नंतर स्वावलंबी भारत अभियानाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकुर, डॉ राजेश गुराणे CO उद्यम सेंटर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, नितीन माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी रंजिता चाकोते, सागर अतनूरे, सतीश पारेली, गुरुराज पदमगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोयोजन रोहित बिद्री यांनी केली.. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, मयूर वडतीले,अक्षय बिराजदार,नागराज बिरादार, रितेश भोसले, शुभम वडतीले, प्रज्वल राऊत, विनायक शिवशेट्टी आदींनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाप्रसंगी भागातील महिला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.


















