सोलापूर – भीम युवक क्रीडा मंडळ संचलित SP प्रतिष्ठान च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त वार्षिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी यशराज चंदनशिवे यांची निवड करण्यात आली.
या वेळी मंडळाचे आधारस्तंभ सिद्धेश्वरजी पांडगळे व प्रतिष्ठान चे संस्थापक समीर पांडगळे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या वेळी सर्व प्रथम भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजा करून बुद्ध वंदना घेण्यात आली त्या नंतर बैठक महादेव तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.























