सांगोला – येथील सांगोला महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थी आत्महत्या रोखणे व अँटी रॅगिंग नियम २००९ च्या अंमलबजावणीसाठी बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिंव्हिग या संस्थेचे प्रशिक्षक अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ताणतणाव कमी करणे, एकाग्रता वाढविणे याबद्दल मार्गदर्शन करत ताणतणावातून मुक्ती मिळवण्यासाठी योगा मेडिटेशन बाबत माहिती देऊन व प्रात्यक्षिके करून घेतले.
प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, संगणक विभाग प्रमुख डॉ.राजकुमार ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नोडल अधिकारी प्रा.सदाशिव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.अमोल कावळे यांनी केले.
























