सांगोला – सांगोल्यातील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत मेडशिंगी (ता.सांगोला) येथे स्वच्छता हिच सेवा अभियानाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, मेडशिंगीचे सरपंच उमा इंगवले, माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर कसबे, कृषी अधिकारी स्वप्नजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाऊसाहेब रूपनर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच स्वप्नजीत पाटील यांनी कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता यांचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले. यावेळी स्वच्छता रॅली काढण्यात आली.
या रॅली मध्ये विद्यार्थी, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे स्टुडंट डिन डाॅ.संजय पवार, प्रा. नीलिमा बनाळे, प्रा.भारती गायकवाड, प्रा.माणिक मोरे, प्रा.संजय जगताप, प्रा.राहूल पाटोळे यांनी परिश्रम घेतले.


















