पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक लक्ष्मीनगर शाळेत आज बाजार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी यावेळेस आपल्या शेतातील भाजीपाला, फळे, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवुन आणले यामध्ये भेळ, शाबुवडा, चिवडा,तसेच किराणा माल, स्टेशनरी साहित्याची अगदी ओरडून विक्री केली.
लक्ष्मीनगर परीसरातील पालकांनी याठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात खरेदी केली यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद अक्षरश द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांना शालेय ज्ञानाबरोबरच व्यवहारी ज्ञानाची लहानपणापासूनच माहीती व्हावी म्हणूनच या बाजार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.व्यवसाय करुन पैसे कसे मिळवायचे याचे आकलन या बाजारामुळे विद्यार्थ्यांना चांगले मिळाले.
या बाजाराचे उद्घाटन साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष शशीकांत घड्याळे, माजी अध्यक्ष संजय पाटील, माजी उपसरपंच स्वाती मदने ,सदस्य पल्लवी मदने,सुशीला मदने, ज्ञानेश्वर मदने,राहुल मदने, अनिता लवटे, छगन मदने, अक्षय गोंजारी, किसन इंगळे, वैभव पाटील, वैभव राऊत, मुख्याध्यापक सुनिल डुरे, सहशिक्षीका साखरे मॅडम, अंगणवाडी सेविका सत्यभामा मदने, मदतनीस सरगर मॅडम याच्या उपस्थित करुन करण्यात आले.
या बाजारास लक्ष्मीनगर परीसरातील पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी या बाल आनंद मेळाव्यास उपस्थित होते. कुसमोड येथील लक्ष्मीनगर शाळेत बाजार दिवसाचे आयोजन.
















