अमरावती येथून गांजाची मोठी खेप मुंबई येथे पोहचविण्याचा तयारीत असलेल्या एका आरोपीच्या ताब्यातून अमरावती पोलीस आयुक्तांच्या सि.आय.यु. पथकाने २१ लाख ६० हजार रुपये किंमतीचा १ क्विंटल ८ किलो गांजा जप्त केला. आरोपी आपल्या आर्टिका कार ने हा गांजा शहरातील जुना बायपास मार्गाने बडनेरा व तेथून मुंबई येथे घेऊन जात असतांना अमरावती पोलिसांनी ही दबंग कारवाई केली.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती मिळाली कि रवि मारोडकर हा त्याच्या दोन साथीदारासह इर्टीका कार क्र. एम.एच. 02 डी. जी. 2911 या कारने अवैद्यरीत्या गांजा विक्री करण्याकरीता गांजाची मोठ्या प्रमाणात खेप घेवुन अमरावती जुना बायपास ने बडनेरा येथे येणार आहे. व तो सदरचा माल मुंबई येथे पाठविणार आहे. अशी खात्री लायक माहीती प्राप्त झाल्याने पोलिसांनी तात्काळ बगीया टी पॉईंट येथे जावुन इटींका गाडी क्र. एम.एच. 02 डी.जी. 2911 पांढ-या रंगाची येतांना दिसली. सदर गाडीवर पुढे व मागे प्रेस लिहलेले दिसुन आले. परंतु सदर वाहनाचा शिताफीने पाठलाग करून सदरची गाडी थांबविली असता सदर गाडीच्या मागच्या सिटवर ओलसर हिरव्या कळीचा उग्र वासाचा ( झाडपत्ती सारखा दिसणारा ) गाँजा वजन प्लॅस्टीक टेप गुंडाळुन पत्नीसह प्रत्त्येकी गट्टू 5 किलो 400 ग्रॅम वजनाचा असे 20 गट्टू मिळुन आले ज्याचे एकुन वजन 1 क्विंटल 8 किलो (108 किलो) गांजा कि.अ. 21,60,000 रु. मिळुन आला तसेच एक पांढ-या रंगाची सुझुकी इर्टीका क्र. एम. एच. 02 डी.जी. 2911 कि. अ. 7,00,000रु. असा एकुन 28,60,000 रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी रवि प्रेमचंद मारोडकर वय 40 वर्ष रा. नांदगाव खंडेश्वर, अम. यास ताब्यात घेवुन त्याचे विरुद्ध तसेच त्याच्या साथीदारा विरुद्ध कलम 20.22.29 एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करूनअटक कऱण्यात आली
सदरची कार्यवाही नविनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त अमरावती शहर पोलीस उपायुक्त परि. 1 अम., विक्रम साळी, पोलीस उपायुक्त परि. 2 अम.,सागर पाटील, प्रशांत राजे सहा. पो.आयुक्त, गुन्हे शाखा अम. यांच्या मार्गदर्शनात क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, पो.उप नि. गजानन राजमल्लु पो.हे.का. सुनिल लासुरकर, विनय मोहोड, ना.पो.शि. जहीर शेख, अतुल संभे, पो.शि. राहुल देंगेकर, विनोद काटकर, यांनी केली आहे.