वर्ष २०२३ इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स म्हणून साजरे केले जात असताना गोदरेज टायसन फूड्स लिमिटेड (जीटीएफएल)चा फ्रोझन रेडी-टू-कूक उत्पादनांचा आघाडीचा ब्रॅण्ड गोदरेज यम्मीज आणि इंडियन रेल्वे कॅटेरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांनी पॅसेंजर ट्रेन्समध्ये मिलेट पॅटी देण्यासाठी सहयोग केला. या वर्षाच्या सुरूवातीला सादर करण्यात आलेल्या गोदरेज यम्मीज मिलेट पॅटीला घराघरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने ज्वारी (सोरगम) व बाजरी (पर्ल मिलेट) यांसारख्या मिलेट्सपासून बनवलेल्या पौष्टिक व स्वादिट पॅटी व्हेरिएण्टचे भरभरून कौतुक केले. या यशाला पुढे घेऊन जात गोदरेज यम्मीज व आयआरसीटीसी यांच्यामधील सहयोगाच्या माध्यमातून मिलेट पॅटी आता मुंबई-दिल्ली-मुंबई मार्गावर धावणाऱ्या राजधानी व ऑगस्ट क्रांती टेन्समध्ये ब्रेकफास्टदरम्यान सर्व्ह केले जात आहे.
गोदरेज यम्मीजने नाविन्यपूर्ण स्नॅक पर्याय म्हणून मिलेट पॅटी विकसित केले. हे स्नॅक इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीज (आयक्यूएफ) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान या स्नॅकला कोणत्याही प्रीझर्व्हेटिव्ह्जशिवाय ताजे राहण्यास मदत करते. उच्च फायबर घटक आणि मिलेटच्या जीवनसत्वांसह हर्ब्स व मसाल्यांचे स्वादिष्ट मिश्रण असलेल्या या पॅटीज निश्चितच स्वादिष्ट व पौष्टिक स्नॅक्स आहेत.
राजधानी व ऑगस्ट क्रांती ट्रेन्स भारतीय रेल्वेमधील प्रख्यात वारसा असलेल्या ट्रेन्स आहेत, ज्या त्यांच्या अपवादात्मक सेवा आणि उल्लेखनीय फूड ऑफरिंग्जसाठी प्रसिद्ध आहेत. गोदरेज यम्मीज आणि आयआरसीटीसी यांच्यामधील सहयोगाचा मिलेट्सच्या अवलंबतेला चालना देण्यासह व्यापक रेल्वे नेटवर्कमध्ये देखील मिलेट्सचे महत्त्व वाढवण्याचा मनसुबा आहे. हा अग्रणी सहयोग राजधानी व ऑगस्ट क्रांती ट्रेन्सच्या मुंबई – दिल्ली – मुंबई मार्गावर पायलट उपक्रम म्हणून कार्यरत आहे. हा उपक्रम महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व दिल्लीदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या चवींची पूर्तता करतो.
गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय पार्नेरकर म्हणाले, ”मिलेट्स स्वादिष्ट नसण्यासोबत सुलभपणे कूक करता येऊ शकत नाही या समजामुळे अलिकाडील काळात मिलेट्स वापर कमी होता. यामध्ये मोठे परिवर्तन झाले आहे आणि आता प्रत्येक घराघरामध्ये मिलेट्सचा वापर केला जातो. आम्ही रेडी-टू-कूक अशा सोईस्कर पद्धतीत पौष्टिक मिलेट्स सादर केले, तसेच लोकांमध्ये लोकप्रिय ‘पॅटी’ व्हेरिएण्टमध्ये त्यांचा समावेश करत या परिवर्तनाला पाठिंबा दिला. गोदरेज यम्मीज मिलेट पॅटी प्रीझर्व्हेटिव्ह-मुक्त स्नॅक आहे, ज्यामधून नाविन्यता, पोषण व सोयीसुविधेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
ते पुढे म्हणाले, ”आम्हाला राजधानी व ऑगस्ट क्रांती ट्रेन्समधील प्रवाशांना स्वादिष्ट गोदरेज यम्मीज मिलेट पॅटीचा आस्वाद घेण्याची सुविधा देण्याचा आनंद होत आहे. आयआरसीटीसी ही सर्वात प्रतिष्ठित कंपनी आहे, जिचे देशभरातील ट्रेन्समध्ये सर्वात मोठे कॅटेरिंग कार्यसंचालन आहे. आयआरसीटीसी सोबतच्या आमच्या विशेष सहयोगामध्ये त्यांची व्यापक पोहोच व रेल्वे कॅटेरिंगमधील कौशल्यासह गोदरेज यम्मीजच्या सर्वोत्तम पाककलेचा समावेश आहे, ज्यामधून मिलेट्सच्या अपवादात्मक व स्वादिष्ट चवीचा अनुभव मिळतो.”
इंडियन रेल्वे कॅटेरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (वेस्टर्न झोन)चे ग्रुप जनरल मॅनेजर राहुल हिमालियन म्हणाले, ”यंदाचे वर्ष इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स असल्यामुळे आम्ही पोषण व स्वादाचे संयोजन करत आमच्या फूड मेनूमध्ये मिलेट्सची भर करण्यासाठी पद्धतींचे सतत मूल्यांकन करत आहोत. आयआरसीटीसीमध्ये आम्ही प्रवाशांना दर्जेदार व स्वादिष्ट फूड देण्याप्रती कटिबद्ध आहोत. राजधानी व ऑगस्ट क्रांती ट्रेन्सवर गोदरेज यम्मीज मिलेट पॅटीचा आस्वाद देण्याचा उपक्रम पायलट म्हणून राबवण्यात येत आहे, ज्यामुळे आयआरसीटीसीची प्रवाशांना रोचक व स्वादिष्ट मिलेट-आाधरित फूड पर्याय देण्याप्रती समर्पितता दृढ झाली आहे. आम्हाला पायलट म्हणून हे उत्पादन सादर करण्याचा अभिमान वाटतो, तसेच हे उत्पादन व्यापक भारतीय रेल्वे नेटवर्कमधील आयआरसीटीसीच्या कॅटरिंग कार्यसंचालनाच्या माध्यमातून मिलेट्स उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनाला साह्य करते. आम्ही प्रवाशांना सर्व्ह करण्यापूर्वी उत्पादनाची चाचणी करण्यासोबत स्वत: आस्वाद घेतला आहे. आम्हाला गोदरेज यम्मीज मिलेट पॅटीला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. हे परिपूर्ण स्नॅक असण्यासोबत पौष्टिक व रेडी-टू-कूक उत्पादन आहे.”
शेफ वरूण इनामदार म्हणाले, ”मिलेट्सकडे सौम्य धान्य म्हणून पाहिले गेले आहे, पण आता त्यामध्ये बदल होत आहे. मिलेट्सकडे दुर्लक्ष केले जात असले तरी ते अत्यंत पौष्टिक व वैविध्यपूर्ण धान्य आहेत, जे सर्वांनी सेवन केले पाहिजे. मिलेट्समध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस व झिंक संपन्न प्रमाणात आहेत. यापूर्वी लोकांना मिलेट्सपासून पदार्थ तयार करणे त्रासदायक वाटायचे. पण आता, ते कूक व सेवन करण्यास सुलभ सुपर-ग्रेन बनले आहेत. मिलेटपासून बनवली जाणारी लापशी, ते मिलेट सॅलड्स आणि बेक केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांपर्यंत विविध प्रकारे मिलेटचा आस्वाद घेतला जातो. ते स्वादिष्ट व पौष्टिक आहेत. तसेच गोदरेज यम्मीज मिलेट पॅटीसह पॅटीजच्या स्वरूपात मिलेटचे सेवन केले जाऊ शकते. हा दररोज मिलेट्स सेवेन करण्याचा उत्तम मार्ग आहे. तसेच, मिलेट्स सुलभ, किफायतशीर व स्टोअर करण्यास सोईस्कर आहेत.”
आज, गोदरेज यम्मीज पोर्टफोलिओमध्ये ५० हून अधिक शाकाहारी व मांसाहारी उत्पादने आहेत. गोदरेज यम्मीज मिलेट पॅटी भारतातील सुपरमार्केट्स आणि आघाडीच्या ई-कॉमर्स रिटेल आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहे. ३७० ग्रॅम पॅकची किंमत १८० रूपये आहे. यम्मीज मिलेट पॅटी सर्वोत्तम दर्जाच्या घटकांपासून बनवण्यात आले आहे आणि रेडी-टू कूक आहे. ते डीप-फ्राय, एअर-फ्राय किंवा शॅलो-फ्राय करता येऊ शकतात आणि गरमागरम सर्व्ह करता येऊ शकतात.