उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे बोगद्यात दरड कोसळून 41 मजुर गेल्या 10 दिवसांपासून अडकले आहेत. या कामगारांशी सोमवारी व्हिडीओच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. आत अडकलेले हे सर्वजण सुरक्षित असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आले.
उत्तरकाशीमधील बोगद्यामध्ये मागीत 10 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य राबवत आहे. या मजुरांना पाईपद्वारे अन्न आणि ऑक्सिजन पुरवठा सुरु आहे. आता या पाईपद्वारे इंडोस्कोपिक कॅमेरा पाठवून कामगारांची परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे बोगद्याच्या आतील मजुरांची परिस्थिती समोर आली आहे. सिल्क्यारा येथील बोगदा दुर्घटनेच्या बचावकार्याला आज पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मागील 10 दिवसांपासून हे मजूर येथे अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत आहे. सध्या एंडोस्कोपिक फ्लॅक्सी कॅमऱ्याद्वारे मजुरांना मदत केली जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी पहिल्यांदाच अन्न पाठवण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी पहिल्यांदाच खिचडी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.