उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत कार अपघातात जखमी झाले. हल्दवानीहून काशीपूरला जाताना रावत यांच्या गाडीला मंगळवारी रात्री अपघात झाला. त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली. या अपघातात रावत यांच्या छातीला दुखापत झाली, तर त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री हरीश रावत बुधवारी पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी रात्री काशीपूरला जात होते. यावेळी त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली. ही घटना रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तातडीने सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे त्यांचे सहकारी आणि पीएसओसोबत प्रवास करत होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रावत यांच्यावर डॉक्टरांनी सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या केल्या. या घटनेतून चालक आणि सुरक्षा कर्मचारी थोडक्यात बचावले.