सोलापूर शहरात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका बावीस वर्षीय भावी डॉक्टराने रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना होटगी (दक्षिण सोलापूर) येथील रेल्वेब्रीजजवळ रविवारी सकाळच्या सुमारास घडली. सचिन श्रीमंत चौधरी (वय-२२, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो कुंभारी येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकण्यास होता. रविवारी सकाळी त्याने हॉस्टेलमधून एका मित्राची दुचाकी घेऊन बाहेर गेला होता. १० वाजण्याच्या सुमारास त्याचा | मृतदेह होटगी परिसरातील श्रीमंत सोनकवडे यांच्या शेतालगतच्या रेल्वे रुळावर छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करून तो शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिला. रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मयत सचिन चौधरी हा अभ्यासात हुशार होता. त्याचे वडील शेती करतात. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन केले. अॅम्बुलन्सने छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आला. याची नोंद वळसंग पोलिसात झाली. तपास फौजदार शेख करीत आहेत.
Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...