द स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या भारतातील सर्वात मोठ्या बँकेने सर्वसमावेशक वर्कशॉपचे आयोजन केले असून त्याद्वारे ग्रामपंचायत पातळीवर जनसुरक्षा योजनांचा विस्तार करण्याचे ध्येय आहे. या वर्कशॉपमध्ये ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील बँकांचे अधिकारी एकत्र आले होते. प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना (पीएमएसबीवाय) या दोन महत्त्वाच्या योजनांचा अवलंब वाढावा यासाठी प्रमुख जिल्हा व्यवस्थापकांना सक्षम करण्याचे या वर्कशॉपचे ध्येय होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून बँकेचे अधिकारी प्रत्येक ग्राम पंचायत आणि देशातील प्रत्येक जिल्ह्यातील वॉर्डमध्ये कॅम्पचे यशस्वी आयोजन करून त्याद्वारे या योजनांविषयी जागरूकता वाढवण्याचे काम करत आहेत.
पीएमजेजेबीवाय योजनेअंतर्गत नागरिकांना जीवन विमा कवच मिळवता येईल, तर पीएमएसबीवायद्वारे प्रत्येकी रू. २.०० लाखांचा जीवन विमा प्रती वर्ष अनुक्रमे ४३६ रुपये आणि २० रुपयांच्या वाजवी प्रीमियममध्ये पुरवला जाईल.
या लक्षणीय उपक्रमासाठी विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये श्री. प्रशांत कुमार गोयल, सह- सचिव (एफआय), आर्थिक सेवा खाते, भारत सरकार, श्री. अलोक कुमार चौधरी, व्यवस्थापकीय संचालक (आरबी अँड ओ) आणि डॉ. पी. सी. साबू, प्रमुख व्यवस्थापक – आर्थिक सर्वसमावेशकता, एसबीआय कॉर्पोरेट केंद्र, मुंबई यांचा समावेश होता. वर्कशॉपमध्ये एसबीआयला देण्यात आलेल्या जिल्ह्यांचे जबाबदार लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर्स (एलडीएम), एसएलबीसी अधिकारी आणि सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसह उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात, नवी दिल्ली, उत्तराखंड आणि दमण दीवचे प्रमुख अधिकारी (लीड बँक) यावेळी हजर होते.
हा उपक्रम एसबीआयची आर्थिक सर्वसमावेशकतेप्रती असलेली बांधिलकी दर्शवणारा आहे. श्री. प्रशांत कुमार गोयल, सह- सचिव (एफआय), आर्थिक सेवा विभाग, भारत सरकार यांनी जनसुरक्षा योजनांअंतर्गत सर्व पात्र नागरिकांचा समावेश करण्याचे ध्येय असल्यावर भर दिला. श्री. अलोक कुमार चौधरी, एमडी (आरबी अँड ओ), एसबीआय यांनी सहभागींना बँक सेवा तसेच पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवायसारख्या भारतीय सरकारी योजनांचा बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या तसेच त्या कमी प्रमाणात उपलब्ध असलेल्या समाजातील सर्व वर्गात विस्तार करण्यासाठी प्रेरणा दिली.