महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय कामगार पुरुष व खुली महिला भजन स्पर्धेत पुरुष गटात कामगार कल्याण केंद्र कुंडल तर महिला गटात इस्लामपूर केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भजन स्पर्धेतील विजेत्यांना आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
वसंतदादा औद्योगिक वसाहत येथील ललित कला भवन येथे झालेल्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमास विभागीय कार्यालय पुणेचे सहाय्यक कल्याण अधिकारी मनोज पाटील, प्रभारी कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, कोल्हापूरचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, वसंतदादा औद्योगिक सह. सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील, कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कुपवाडचे अध्यक्ष सतीश मालू, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे संचालक शिवानंद कबाडे, अशोक इरळे, कामगार भूषण व पंच रामकृष्ण चितळे आदि उपस्थित होते.
या वर्षी सांगली गटांतर्गत या भजन स्पर्धेसाठी संघ मंडळाच्या केंद्रांचे निमंत्रित संघ होते. यामध्ये सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर, मांजर्डे, माडगुळे, कुंडल आदी संघांनी सहभाग घेतला. पुरुष गटात कामगार कल्याण केंद्र कुंडल- प्रथम, कामगार कल्याण केंद्र- इस्लामपूर- द्वितीय आणि कामगार कल्याण केंद्र, कराड यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर महिला गटात कामगार कल्याण केंद्र इस्लामपूर- प्रथम, कामगार कल्याण केंद्र, माडगुळे- द्वितीय आणि कामगार कल्याण केंद्र तासगाव केंद्राने तृतीय क्रमांक पटकावला आहे.