कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबर रोजी येत आहे. या दिवशीची पहाटे २:२० वाजता होणारी विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक केली जाणार आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यापैकी कोणाला बोलवायचे, याबाबत विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निर्णय घेणार असल्याचे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक मंगळवारी झाली.
औसेकर म्हणाले, कार्तिक यात्रा कालावधी १४ ते २७ नोव्हेंबर २०२३ असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात.