गोंदिया रेल्वे हद्दीतील लेव्हल रेल्वे क्रॉसिंग गेट 515, च्या रिले रूमचे कुलूप तोडून रेल्वे रॅक मधील 41 रिले चोरून नेल्याने हावडा – नागपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक व्यवस्था खोळंबली. दरम्यान रेल्वेची मोठी दुर्घटना होता होता थोड्क्यात टळली. सदर रेल्वेच्या सिग्नल प्रणाली रिले चोरीच्या गंभीर घटनेबाबत रेल्वे प्रशासनातील वरीष्ठ रेल्वे बोर्ड अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वेळीच माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल आणि मदतीकरिता पोलीस ठाणे गंगाझरी येथील पोलीस पथकांनी आरोपी सलाम रफिक शेख (24), जितेंद्र उर्फ जितू नरेंद्र गिरी (34), ऋषभ उर्फ सोनू शशिकांत सिंह (24), सगळे रा. गंगाझरी व एक विधी संघर्ष बालक अश्या चौघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी प्रस्तुत गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण माल रेल्वे पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...