आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना उच्च न्यायालयाने 28 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नायडू यांना 9 सप्टेंबर रोजी कौशल्य विकास घोटाळ्यात सीआयडीने नांदयाल येथून अटक केली होती. उच्च न्यायालयाचे वकील सुनाकारा कृष्णमूर्ती यांनी ही माहिती दिली.
सीआयडीने नायडू यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल केला आहे. ताजे प्रकरण दारू दुकानांच्या परवान्याशी संबंधित आहे. मागील सरकारच्या काळात अवैध दारू दुकानांना परवाने दिल्याचा नायडूंवर आरोप आहे. चंद्राबाबू यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक (पीसी) कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चंद्राबाबूंना आरोपी क्रमांक 3 करण्यात आले आहे. सीआयडीने नायडूंविरुद्ध चार वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. कौशल्य विकास घोटाळ्यात ते आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याविरुद्ध अंगलू प्रकरण आणि अमरावती रिंगरोड प्रकरणातही तपास सुरू आहे.