सोमाटणे येथील गणेशनगरमधील एका रहीवासी इमारतीत २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. डेबू राजन खान (वय २७, मूळ रा. बालवडकर बिल्डिंग,जुना बस स्टाॅपजवळ ,कात्रज, पुणे.सध्या राहणार गणेशनगर,शिंदे वस्ती,सोमाटणे, ता. मावळ, पुणे) असे मयताचे नाव आहे.याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्याच्या भावाने त्यांना जनरल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणला असता सायंकाळी साडेसहाला डाॅ. सोनवणे यांनी मृत घोषित केले. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून शवविच्छेदनानंतर सायंकाळी सातच्या दरम्यान मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला, अशी माहीती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली.