उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एलर्जी झाली अशी खरमरीत टिका गिरीश महाजन यांनी केली. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जळगाव येथून रेल्वेने नाशिक येथे आल्यानंतर पत्रकार सोबत गिरीश महाजन बोलत होते. मुख्यमंत्री येत्या काही दिवसात बदलणार आहे असे व्यक्तव्य उद्धव व आदित्य ठाकरे करीत असल्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत त्यांना प्रचंड एलर्जी झाली आहे. त्यामुळे सारखं त्या विषयीच ते बोलत असतात.
येत्या निवडणूक पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असा दावा त्यांनी यावेळी केला. आपण वैद्यकीय मंत्री असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 ते 17 तास काम करतात. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होणार. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या कार्यकाळात केवळ अडीच दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे इतरांवर टीका करणे सोपे वाटते, असे बोलत उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.
पालकमंत्री बदला बाबत विचारले असता महाजन यांनी सांगितले की, हा प्रशासकीय भाग आहे. मी लातूरला जाणार होतो. मात्र मला नाशिक, भुसे यांना धुळे तर भुजबळ यांना अमरावती येथे पाठवले असून, पालकमंत्री पदाचा कुठलाही वाद नाही असे सांगून त्यांनी त्या यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, जिल्हा पदाधिकारी सुनील आडके, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, शांताराम घंटे, युवा नेते सचिन हांडगे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिकरोड रेल्वे स्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.